Friday, July 28, 2017

बाईचा पुतळा, कल्याण

*बाईचा पुतळा*

गोष्ट कल्याण शहरातली आहे.
सत्तरच्या दशकात कधितरी रस्ता रुंदीकरणामधे  रेल्वेस्थानक ते सिंडिकेट रस्त्यावर रेल्वे फाटका कडील चौकात उपलब्ध जागेत (ट्रॅफिक आयलंड) सुशोभिकरणासाठी सेंच्युरी रेयाॅन या कंपनीने एक सुंदर शिल्प डोनेट केले होते.

 खांद्यावर घडा घेऊन उभी
असलेली एक वत्सला स्त्री  व तिच्या पायाशी एक लडिवाळ बालक त्या घड्यातुन पडणार्‍या धारांतुन जल प्राशन करत असलेले हे शिल्प होते.
९५नंतर त्या चौकातुन उड्डाणपुल बांधताना जागेच्या कमतरते मुळे पालिकेने हा पुतळा तेथुन हलवला.
 उड्डाणपुल पुर्ण झाल्यावर सुद्धा हे शिल्प तेथे पुर्नस्थापित न झाल्यामुळे उत्सुकता म्हणुन चौकशी सुरु केली तर ते शिल्प पालिकेच्या आवारात अडगळीत पडुन असल्याचे आढळले.

पुढे काही दिवसांनी त्या अडगळीतुनही ते गायब झाल्याचे कळल्याने आमची शोध मोहिम सुरु झाली व काही दिवसांनी हा शोध लागला तो समाजाचा एक
*विलक्षण दृष्टीकोन*घेऊनच.
अधिक चौकशीत कंपनीकडुन असे कळले की कंपनीने हे शिल्प *आईचा पुतळा* म्हणुनच स्थापित करण्याच्या अटीवर पालिकेला दिले होते परंतु सामाजिक दृष्टीकोन असा की
हे शिल्प *बाईचा पुतळा*म्हणुनच प्रसिद्ध झाले एव्हढेच नव्हे तर आजही हे शिल्प तिथे नसताना सुद्धा तो स्टाॅप *बाईचा पुतळा*म्हणुनच प्रसिद्ध आहे.
आणी सेंच्युरी कंपनीच्या आवारात आजही हे शिल्प *आईचा पुतळा*म्हणुन कुंपणाआड आपले वात्सल्य जपत उभा आहे.

No comments:

Post a Comment